महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात पूर; रेस्क्यू करून २३ बांधकाम मजुरांना वाचवलं

पुराच्या पाण्यात अडकलेल्या २३ बांधकाम मजुरांना गडचिरोली जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने सुखरुप बाहेर काढले. हे मजूर वैनगंगा नदीवरिल कोटगल बॅरेजचे बांधकाम करण्यासाठी तिथे गेले होते. पण अचानक पाणी वाढले आणि त्यात ते अडकले होते.

gadchiroli flood : Rescue Operation To Save 23 labour
गडचिरोली जिल्ह्यात पूर; रेस्क्यू करून 23 बांधकाम कामगारांना वाचवलं

By

Published : Aug 31, 2020, 12:20 PM IST

गडचिरोली - चारही बाजूने पुराच्या पाण्यात अडकलेल्या २३ बांधकाम मजुरांची प्रशासनाने सोमवारी रेस्क्यू ऑपरेशन रावबून सुटका केली. गडचिरोली लगतच्या वैनगंगा नदीवर कोटगल बॅरेजचे बांधकाम सुरू असून त्या बांधकामासाठी आलेले मजूर तिथे झोपड्या बांधून राहत होते.

तीन दिवसांपासून जिल्ह्यात पूरस्थिती आहे. चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे बांधकाम स्थळी असलेल्या कामगारांना बाहेर पडता आले नाही. ही बाब आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळली. तेव्हा आपत्ती व्यवस्थापनाने पोलिसांच्या मदतीने रेस्क्यु ऑपरेशन करून त्यांची सुटका केली.

मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे ४ ते ५ मीटरने उघडण्यात आले आहे. या धरणातून २८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. यात हजारो एकर शेती पाण्याखाली आली आहे.

क्रिष्णा रेड्डी अधिक माहिती देताना...

वैनगंगा नदीच्या उपनद्या खोब्रागडी, सती, वैलोचना व प्राणहिता दुथडी भरुन वाहत आहेत आहेत. त्यामुळे आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून नागपूर-गडचिरोली, तर आष्टी मार्गे चंद्रपूर-गडचिरोली मार्ग बंद करण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून आजवरचा सर्वाधिक २८ हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आगामी काळात जिल्ह्यात पूर स्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. धरणातील पाणी वैनगंगा नदीत प्रवाहित होत असून यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.

हेही वाचा -गोसेखुर्द धरणाच्या पाण्याने गडचिरोली जिल्ह्यात पुराचा महाप्रलय

हेही वाचा -गोसेखुर्दच्या पाण्याने गडचिरोली जिल्ह्यात महापूर; अनेक प्रमुख मार्ग बंद, गावांचा संपर्क तुटला

ABOUT THE AUTHOR

...view details