महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Naxalite Surrender Gadchiroli : ११ लाखांचे बक्षीस असलेल्या महिला नक्षलवादीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण - आत्मसमर्पण सह पुनर्वसन धोरण

Naxalite Surrender Gadchiroli : गडचिरोलीत रजनी, उर्फ कलावती समय्या वेलाडी नामक महिला नक्षलवादीने आत्मसमर्पण केल्याची बातमी समोर आली आहे. रजनीवर 11 लाखांचे रोख बक्षीस पोलिसांनी ठेवले होते. आता तिने आत्मसमर्पण केल्याने तिला पुनर्वसनासाठी केंद्र आणि राज्य सरकारने घोषित केलेले 4.50 लाख रुपये मिळतील.

Gadchiroli
गडचिरोली

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 5:12 PM IST

Updated : Oct 7, 2023, 5:29 PM IST

गडचिरोली : Naxalite Surrender Gadchiroli : गडचिरोलीत एका महिला नक्षलवादीने आत्मसमर्पण केल्याची बातमी समोर आली आहे. रजनी, उर्फ कलावती समय्या वेलाडी असं या महिला नक्षलवादीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रजनीवर 11 लाखांचं रोख बक्षीस पोलिसांनी ठेवलं होतं. परंतु आता रजनीनं आत्मसमर्पण केल्यानं तिला पुनर्वसनासाठी केंद्र आणि राज्य सरकारने घोषित केलेले 4.50 लाख रुपये मिळतील.

वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये रजनीचा सहभाग :एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक चकमकीत सहभागी असलेल्या रजनीने आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. छत्तीसगडमध्ये 2017 मध्ये झालेल्या एका चकमकीत 12 जवानांना हौतात्म्य आलं होतं. याबरोबरच जाळपोळ आणि खून अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये रजनीचा सहभाग होता.

आत्मसमर्पण-सह-पुनर्वसन धोरण : प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) चे अनेक सदस्य त्यांच्या नेत्यांच्या पोकळ दाव्यांमुळे आणि नागरिकांवरील त्यांच्या हिंसाचारामुळे निराश झालेत. त्यामुळे नक्षलवादी आता महाराष्ट्राच्या आत्मसमर्पण-सह-पुनर्वसन धोरणाकडे आकर्षित होत आहेत, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, आत्तापर्यंत 586 सक्रिय माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. तसंच शरणागती पत्करण्यास आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असलेल्यांना सर्व आवश्यक सहाय्य करण्यात आलं आहे, असंही प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

20 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली जोडप्यानेही केले होते आत्मसमर्पण :काही दिवसांपूर्वी देखील20 लाख बक्षीस असलेल्या एका नक्षल जोडप्याने पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं होतं. ( Naxalite Couple Surrendred Gadchiroli Police ) यात दीपक इष्टाम (34) या डिव्हिजनल कमांडरचा समावेश असून त्याने पत्नी शामबत्ती अलाम (25) सह पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं.

Last Updated : Oct 7, 2023, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details