महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली : दुसऱ्या टप्प्यात 150 ग्रामपंचायतीसाठी 486 केंद्रावर मतदान; पोलिसांचा चोख बंदोबस्त

जिल्हयातील जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी चामोर्शी, मूलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा तालुक्यातील 150 ग्रामपंचायतींसाठी 486 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

By

Published : Jan 20, 2021, 11:31 PM IST

Updated : Jan 21, 2021, 12:09 AM IST

गडचिरोली - जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 20 जानेवारी रोजी 150 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाला सकाळी 7.30 वाजता सुरुवात झाली व दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. जिल्हयातील चामोर्शी, मूलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा तालुक्यातील 486 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्र अतिसंवेदनशील असल्याने नक्षलवादी घातपात रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा लावण्यात आली होती.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

सुरक्षा यंत्रणांची होती कसोटी -

  • दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, अहेरी हे नक्षल कारवायांसाठी प्रसिद्ध तालुके आहेत. त्यामुळे या तालुक्यात कोणतीही निवडणूक म्हटल्यास नक्षलवाद्यांकडून घातपाताची तयारी असते. पहिल्या टप्प्यात सुरक्षितरित्या मतदान पार पडले असले तरी दुसऱ्या टप्प्यात निर्विघ्नपणे मतदान पार पडण्याची खरी कसोटी सुरक्षायंत्रणा समोर होती. त्यामुळे जिल्हा पोलिस दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल अशा फोर्स जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या होत्या.
    ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त


    तालुकानिहाय ग्रामपंचायती आणि मतदार -
    1) चामोर्शी - एकुण ग्रामपंचायती 65, मतदान केंद्र-209, मतदार - 106154
    2) मूलचेरा - एकुण ग्रामपंचायती 14, मतदान केंद्र-48, मतदार - 31627
    3) अहेरी - एकुण ग्रामपंचायती 28, मतदान केंद्र-96, मतदार - 53691
    4) एटापल्ली - एकुण ग्रामपंचायती 14, मतदान केंद्र-46, मतदार - 21939
    5) भामरागड - एकुण ग्रामपंचायती 2, मतदान केंद्र-6, मतदार - 2320
    6) सिरोंचा - एकुण ग्रामपंचायती 27, मतदान केंद्र-81, मतदार - 33907
    ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त


    पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यात 82.18 टक्के मतदान-

पहिल्या टप्प्यात 15 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील 6 तालुक्यात 82.18 टक्के मतदान झाले होते. या मतदानात कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा या तालुक्यातील 170 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष निवडणूका झाल्या होत्या. दोन्ही टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी 22 जानेवारी रोजी होणार आहे.

Last Updated : Jan 21, 2021, 12:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details