गडचिरोली -जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून अजय कंकडालवार यांची निवड झाली. त्यानंतर इंदाराम या त्यांच्या गावी जंगी स्वागत करण्यात आले. अजय कंकडालवार यांचा ग्रामपंचायत सदस्य ते गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष असा राजकीय प्रवास आहे.
गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे जंगी स्वागत - गडचिरोली जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून अजय कंकडालवार यांची निवड
गडचिरोली जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून अजय कंकडालवार यांची निवड झाली. त्यानंतर इंदाराम या त्यांच्या गावी जंगी स्वागत करण्यात आले. अजय कंकडालवार यांचा ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष असा राजकीय प्रवास आहे.
![गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे जंगी स्वागत Ajay Kankdalwar welcomed in indaram](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5615221-195-5615221-1578318772736.jpg)
भगवंतराव हायस्कूलपासून ते साईमंदीर चौकापर्यंत ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून अजय यांचे स्वागत करण्यात आले. या परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2005 मध्ये इंदारम ग्रा. पं सदस्य म्हणून अजय हे राजकारणात सक्रिय झाले. तेव्हापासून आदिवासींच्या प्रत्येक समस्यासाठी, आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून या परिसराच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. लोकप्रिय नेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. 2007 मध्ये देवलमरी क्षेत्रातून पंचायत समिती सदस्य म्हणून ते निवडून आले. 2012 मध्ये देवलमरी- रेपनपल्ली जि. प. सदस्य म्हणून निवडून आले. जि. प. कृषी सभापतीपद त्यांनी भूषवले होते. 2017 मध्ये आलापल्ली - वेलगुर क्षेत्रतून ते जि.प सदस्य म्हणून निवडून आले. आता ते गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर विराजमान झाले.