गडचिरोली - कोरोना प्रतिबंधासाठी पुढची दोन आठवडे अतिशय महत्वपूर्ण आहेत. आवश्यकता असेल तरच सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती द्यावी. अन्यथा परस्परांपासून अलिप्त घरातच राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा प्रशासनाने केले आहे.
३१ तारखेपर्यंत नागरिकांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी. गरज पडल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या जिल्हा सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. याठिकाणी आता वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची २४ तास तैनाती करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. मात्र, पुढचे दोन आठवडे प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.