गडचिरोली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्राचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये गडचिरोली विधानसभेतून भाजपचे डॉ. देवराव होळी, आरमोरी विधानसभेतून भाजपचे कृष्णा गजबे, तर अहेरी विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम विजयी झाले आहेत.
अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये काट्याची टक्कर बघायला मिळाली होती. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम, भाजपकडून माजी राज्यमंत्री अंबरीश आत्राम आणि काँग्रेसकडून दीपक आत्राम रिंगणात होते. मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीच्या २-३ फेर्यांमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ बघायला मिळाली. मात्र, शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपचे अंबरीश आत्राम यांचा १५ हजाराहुन अधिक मतांनी पराभव केला.