गडचिरोली: एका प्रेमीयुगुलाने शुक्रवारी गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील व्याहाळनजीकच्या वैनगंगा नदीत उडी घेतली. दोघेही किशोरवयीन आहेत. मुलगा १८ वर्षांचा तर मुलगी १६ वर्षांची आहे. रात्री उशिरापर्यंत दोघांचाही शोध लागला नव्हता.
अल्पवयीन प्रेमीयुगुलाची वैनगंगेत उडी; दोघेही बेपत्ता - प्रेमीयुगलांची वैनगंगा नदीत उडी
शुक्रवारी सकाळी एक मुलगा व एक मुलगी दुचाकीने व्याहाळनजीकच्या वैनगंगा नदीच्या पुलावर आले. त्यानंतर दोघांनीही नदीत उडी घेतली. ही घटना प्रत्यक्ष बघणाऱ्यांनी सावली पोलीस ठाण्यात माहिती दिली.
शुक्रवारी सकाळी एक मुलगा व एक मुलगी दुचाकीने व्याहाळनजीकच्या वैनगंगा नदीच्या पुलावर आले. त्यानंतर दोघांनीही नदीत उडी घेतली. ही घटना प्रत्यक्ष बघणाऱ्यांनी सावली पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर गडचिरोली पोलीस ठाण्यालाही कळविण्यात आले. गडचिरोली पोलिसांनी मुलीच्या वडिलांना घेऊन घटनास्थळ गाठले. मुलगी दररोज पहाटे ४ वाजता फिरायला जात होती. परंतु बराच वेळपर्यंत ती घरी आली नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
घटनास्थळावर आढळलेली दुचाकी ही गडचिरोलीतील रामनगरचा रहिवासी असलेल्या मुलाची असल्याचे समोर आले आहे. गडचिरोली व सावली पोलिसांनी दिवसभर नदीत बोटीद्वारे दोघांचाही शोध घेतला. परंतु उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. सावली पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.