गडचिरोली - राज्यात संचार बंदी ही अगोदरच लागू झाली होती, आता सर्व भारतात आहे. आपल्या जिल्ह्यात नागरिकांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी काळजी करावी, प्रशासन जीवनावश्यक वस्तूंबाबत आवश्यक उपाययोजना राबवत आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.
'जीवनावश्यक वस्तूंबाबत प्रशासनाकडून उपाययोजना; नागरिकांनी गर्दी करू नये'
संचारबंदीनंतर सामान्य जनजीवन काही प्रमाणात बिघडले आहे. परंतू आपणाला आता हळूहळू घरी राहण्याची सवय लावावी लागेल. पुढचे २० दिवस महत्त्वाचे आहेत, आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजातील प्रत्येक घटकासाठी या जागतिक संसर्गाला लढा देणे आता गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले.
आवश्यक दैनंदिन उपयोगाच्या वस्तू नागरिकांना वेळेत मिळण्यासाठी दुकाने सुरू आहेत. भाजीपाला, दूध व किराणा दुकानांमध्ये साठा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नका. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपण संचारबंदी केली आहे. बाहेर पडताना आवश्यक काळजी घ्या. इतर लोकांपासून आवश्यक अंतर ठेवून राह, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
अकारण बाहेर फिरण्यावर स्वत:हून बंदी घाला, पोलिसांना सहकार्य करा नाहीतर नाईलाजास्तव त्यांना सक्तीने कारवाई करावी लागेल. कोरोना संसर्गाची काळजी प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. संचारबंदी नंतर सामान्य जनजीवन काही प्रमाणात बिघडले आहे. परंतू आपणाला आता हळूहळू घरी राहण्याची सवय लावावी लागेल. पुढचे २० दिवस महत्त्वाचे आहेत, आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजातील प्रत्येक घटकासाठी या जागतिक संसर्गाला लढा देणे आता गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.