महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हुतात्मा पोलीस जवान दुशांत नंदेश्वर यांना राज्यमंत्री यड्रावकर यांच्या उपस्थितीत मानवंदना - dushyant nandeshwar news

पोलीस दलातर्फे संपूर्ण शासकीय नियमानुसार हुतात्मा पोलीस जवान दुशांत नंदेश्वर यांना भावपूर्ण मानवंदना देण्यात आली.

 हुतात्मा पोलीस जवान दुशांत नंदेश्वर यांचे पार्थिव
हुतात्मा पोलीस जवान दुशांत नंदेश्वर यांचे पार्थिव

By

Published : Aug 15, 2020, 4:17 PM IST

गडचिरोली - भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रा अंतर्गत येणाऱ्या भागात नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांवर हल्ला केला. यात पोलीस जवान दुशांत नंदेश्वर यांना वीरमरण आले. आज स्वतंत्र दिनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व पोलीस दलातर्फे हुतात्मा पोलीस जवान दुशांत नंदेश्वर यांना पोलीस कवायत मैदानावर सशस्त्र पोलीस दलातर्फे बंदुकीच्या हवेत फैरी झाडून सलामी देण्यात आली.

पोलीस दलातर्फे संपूर्ण शासकीय नियमानुसार हुतात्मा पोलीस जवान दुशांत नंदेश्वर यांना भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अति पोलीस अधीक्षक मोहित गर्ग, अजयकुमार बन्सल यांनी हुतात्मा दुशांत नंदेश्वर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले व भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी हुतात्मा जवान नंदेश्वर यांचे परिवार उपस्थित होते. राज्यमंत्री यड्रावकर यांनी हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व त्यांचे सांत्वन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details