महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना निधी कमी पडू दिला जाणार नाही - पालकमंत्री - गडचिरोली लेटेस्ट न्यूज

जिल्ह्यात सध्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे चांगले कार्य सुरू आहे. इतर विकास कामेही प्रगतीपथावर आहेत. आरोग्य सुविधांसह इतर सर्वच विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून, जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागाचे लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर
एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर

By

Published : Apr 7, 2021, 9:52 PM IST

गडचिरोली -जिल्ह्यात सध्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे चांगले कार्य सुरू आहे. इतर विकास कामेही प्रगतीपथावर आहेत. आरोग्य सुविधांसह इतर सर्वच विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून, जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागाचे लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर

शस्त्रक्रिया विभागाचे लोकार्पण

एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नुतनीकरण करण्यात आलेले शस्त्रक्रिया विभागाचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी रुग्णालयातील इतर सुधारणांची देखील पाहणी केली. यापूर्वीच जिल्हा सामान्य रुग्णालयात आरटी-पीसीआर प्रयोशाळा, अत्याधुनिक अतिदक्षता कक्ष यांचे देखील लोकार्पण करण्यात आले आहे, त्याबाबत देखील एकनाथ शिंदे यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशीर्वाद कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रूडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा -सचिन वाझेंचा नवा लेटर बॉम्ब.. पुन्हा पोलीस सेवेत घेण्यासाठी देशमुखांनी मागितले दोन कोटी !

ABOUT THE AUTHOR

...view details