महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मल्लमपहाळी गावात 14 जणांना मलेरियाची लागण; एका मुलीचा मृत्यू - मुलीचा मृत्यू

वातील चौथीच्या वर्गात शिकणारी करीना बिरबल टोप्पो हा मुलीचा 21 एप्रिलला मलेरियाने गडचिरोली येथे उपचार दरम्यान मुत्यु झाल्याने सदर गावात आरोग्य यंत्रणा पोहचली. मृत मुलीचे आई वडील दोन बहीणी या चौघांनाही मलेरीयाची लागण झाली असून यांच्यासह गावातील एकुण १४ जणांना मलेरिया झाला आहे.

Malaria infected family
मलेरिया बाधित कुटुंब

By

Published : Apr 27, 2020, 8:17 AM IST

गडचिरोली -एटापल्ली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गट्टा अंतर्गत उपकेंद्र हेडरी हद्दीतील मल्लमपहाळी गावात मलेरियाची लागण होऊन २१ एप्रिलला एका मुलीचा मृत्यु झाला. तेव्हा गावात मलेरिया पाझिटिव्ह संख्या १० होती. रविवारपर्यंत आणखी मलेरियाचे रुग्ण वाढले असून संख्या १४ वर पोहचल्याने गावकरी चिंतेत आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी एकीकडे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकडे लक्ष केंद्रीत करत असताना दुसरीकडे मलेरियाच्या साथीने थैमान आरोग्य कर्मचारी हैराण झाले आहे.

१७ एप्रिलला मल्लमपहाळी येथील करीना बिरबल टोप्पो (१३) या मुलीला ताप आल्याने तपासणीसाठी हेडरी उपकेंद्रात आणले गेले. इथे तिला मलेरिया झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्यावर उपकेंद्रात उपचार करुन मलेरियाचे ओषध देण्यात आले,व ती गावाला परत गेली. मात्र, ताप कमी न झाल्याने पुन्हा २० तारखेला परत ती उपकेंद्र हेडरी येथे आली असता तिला हेडरी वरुन ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे रेफर करण्यात आला.एटापल्ली वरुन त्याच दिवशी अहेरी उप रुग्णालयात तेथूनन जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले होते. गडचिरोली येथे उपचारा दरम्यान तिचा २१ एप्रिलला मृत्यु झाला.

मल्लमपहाळी गाव अतिदुर्गम डोंगराळ घनदाट जंगलात असून २०० आदिवासी लोकांची वस्ती असुन, या गावातील चौथीच्या वर्गात शिकणारी करीना बिरबल टोप्पो हा मुलीचा 21 एप्रिलला मलेरियाने गडचिरोली येथे उपचार दरम्यान मुत्यु झाल्याने सदर गावात आरोग्य यंत्रणा पोहचली. हेडरी येथील उपकेंद्रात तपासणी दरम्यान १० जणांना मलेरीयाची लागण झाल्यांचे रक्ताच्या तपासणीच्यावरुन सिध्द झाले. मृत मुलीचे आई वडील दोन बहीणी या चौघांनाही मलेरीयाची लागण झाली असून यांच्यासह रविवारपर्यंत गावातील एकुण १४ जणांना मलेरिया झाला आहे.आरोग्य विभाग दखल घेऊन सर्वांचे रक्तनमुने घेऊन उपचार सुरु केले आहे. २४ एप्रिलला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक,व तालुका आरोग्य अधिकारी राजेश वाहने यांनी गावत भेट देत गावतील परिस्थिती जाणून घेतली. सध्या साथ नियंत्रणात आहे. आरोग्य सेवक, आशा वर्कर गोळ्या औषधे देत देखरेख करत आहेत.

सध्या आरोग्य विभागाचे कर्मचारी कमी आहेत, कोरोना प्रदुर्भाव रोखण्याकडे त्यांचे अधिक लक्ष आहे. बाहेर गावी गेलेले लोक गावी परतले त्यंच्याकडून काही संसर्ग होऊ नये याकडे आरोग विभागाचे कर्मचारी लक्ष देऊन आहेत. यातच मलमपहाळ गावात मलेरियाचे थैमान घातले.मलेरियाने एक मुलगीही दगावले गावात मलेरियाचे पथक जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणेल, अशी प्रतिक्रिया एटापल्लीचे संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details