गडचिरोली - उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रूग्णालयातील व्हेंटिलेटरची गरज पूर्ण करणेसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी चार व्हेंटिलेटर गडचिरोली जिल्ह्यासाठी देण्यात आले. यातून ग्रामीण भागातील व्हेंटिलेटरची गरज पूर्ण होईल, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हेंटीलेटर लोकार्पण करते वेळी व्यक्त केले. ते सोमवारी गडचिरोली येथे आले होते. यावेळी मंत्री शसामंत यांनी दिलेले व्हेंटिलेटर लवकरात लवकर सुरू करून आरोग्यसेवेत दाखल करावेत अशा प्रशासनाला सूचना दिल्या.
गडचिरोली : ग्रामीण भागातील व्हेंटिलेटरची गरज पूर्ण होईल - मंत्री उदय सामंत - गडचिरोली कोरोना अपडेट
उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रूग्णालयातील व्हेंटिलेटरची गरज पूर्ण करणेसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी चार व्हेंटिलेटर गडचिरोली जिल्ह्यासाठी देण्यात आले.

विदर्भातील कोरोना संसर्ग यशस्वीरीत्या रोखण्यासाठी प्रशासनाने चांगले कार्य केले आहे. गडचिरोली जिल्हा ही यामध्ये आघाडीवर असून जिल्हाधिकारी यांचेपासून ते ग्रामीण स्तरावरील सर्वच यंत्रणेने उत्कृष्ट कार्य केलेले आहे, असे मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. प्रशासनाने संसर्गाला रोखण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आणि पहिल्या लाटेबरोबर दुसरीही संसर्गाची लाट रोखण्यात यश मिळविले याबद्दल सर्वांचे कौतुक मंत्री सामंत यांनी यावेळी केले. येत्या काळातही कोरोनाशी लढायचे आहे. त्यामुळे त्यासाठी तयारी व उपाययोजनाही कराव्या लागणारआहेत असे ते यावेळी म्हणाले. व्हेंटिलेटरच्या लोकार्पणावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्र.जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते.