गडचिरोली - शुक्रवारी जिल्ह्यात आणखी ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे. यातील २ रुग्ण कुरखेडा, १ चामोर्शी तालुका आणि १ मूळचा कोरची तालुक्यातील रहिवासी आहे. तीन रुग्णांना मुंबईहून आल्याबरोबर संबंधित तालुक्याच्या ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. तर कोरची तालुक्यातील रुग्णाला गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
गडचिरोली जिल्ह्यात आणखी आढळले चार रुग्ण; एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 13 वर - Gadchiroli covid 19 hospital
शुक्रवारी जिल्ह्यात आणखी ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे. यातील २ रुग्ण कुरखेडा, १ चामोर्शी तालुका आणि १ मूळचा कोरची तालुक्यातील रहिवासी आहे.
शुक्रवारी रात्री आठ वाजता प्राप्त अहवालानुसार, आणखी चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील २ रुग्ण कुरखेडा, १ चामोर्शी तालुका व १ मूळचा कोरची तालुक्यातील रहिवासी आहे. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १३ वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
तत्पुर्वी, सोमवारी जिल्ह्यात ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर जिल्ह्यात १० ठिकाणे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी एक तर बुधवारी दोन रुग्ण आढळून आले होते. गुरुवारी आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता.