गडचिरोली - जिल्ह्यात रविवारी सकाळी 24 रुग्ण आढळून आल्यानंतर सायंकाळी पुन्हा 18 रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शतक पार केले आहे. रविवारी 23 सीआरपीएफ जवान पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सोमवारी आणखी 4 जवान पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 111 वर पोहोचली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा शतकपार; आणखी 4 सीआरपीएफ जवान पॉझिटिव्ह - gadchiroli crpf man covid 19 positive
गडचिरोली जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 51 झाली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 59 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 111 झाली आहे. गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात 59 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. यामधील 8 रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.
![गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा शतकपार; आणखी 4 सीआरपीएफ जवान पॉझिटिव्ह crpf covid 19 news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-09:16:58:1594093618-mh-gad-corona-news-7204540-06072020200946-0607f-1594046386-641.jpg)
रविवारी सकाळी गडचिरोली येथे केंद्रीय राखीव दलाचे 22 जवान व भामरागड तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले. हे सर्वजण दुसऱ्या राज्यातून व जिल्ह्यातून आले होते. तसेच ते संस्थात्मक विलगीकरणात होते. तर सोमवारी वडसा येथील सीआरपीएफ बटालियनमधील पुन्हा 4 जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत.
जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 51 झाली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 59 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 111 झाली आहे. गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात 59 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. यामधील 8 रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.
सोमवारी जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील एक, कुरखेडा तालुक्यातील एक व चामोर्शी तालुक्यातील एक असे मिळून 3 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. यावेळी अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किनलाके, अधिसेविका अनिता निकोडे, सहायक अधिसेवक शंकर तोगरे यांनी कोरोनामुक्त व्यक्तींना विलगीकरण सूचना व साहित्य वाटप केले. जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या एकदम एका दिवशी मोठया संख्येने वाढल्यामुळे प्रशासन अधिक काळजी घेत आहे. यामध्ये नागरिकांनी घाबरून न जाता संसर्ग होऊ नये म्हणून, अधिक सतर्क राहावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला मास्क किंवा रूमाल लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.