महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत पूरस्थिती : दोनशेहून अधिक गावांचा संपर्क तुटला

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 200 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला सहाव्यांदा पूर आला असून, अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 200 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे

By

Published : Sep 6, 2019, 11:10 AM IST

गडचिरोली - गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 200 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला सहाव्यांदा पूर आल्याने अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 200 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे

तसेच धानोरा तालुक्यातील रांगी, चामोर्शी, छल्लेवाडा यांसह अनेक गावांमध्ये रात्री पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. येत्या काही काळात पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा पैनगंगा नदीला आलेल्या पुरात युवक बेपत्ता

6 ते 8 सप्टेंबर दरम्यान पुन्हा मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवल्याने जिल्हाधिकार्‍यांनी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून, स्थानिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. सध्या सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

हेही वाचा नांदेड : पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह ४१ तासांच्या शोधमोहिमेनंतर हाती

पुरामुळे कुरखेडा-वैरागड-रांगी, अहेरी-देवलमरी, अल्लापल्ली-भामरागड, कमलापूर-रेपनपली, शंकरपुर- बोडधा, आरमोरी-वडसा, फरी-किनाळा, एटापल्ली- आलापल्ली हे प्रमुख मार्ग बंद आहेत. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच आष्टी-चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्गही बंद होण्याच्या मार्गावर आहे. एकूणच जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details