महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतूक करणारे 5 ट्रक जप्त - गडचिरोलीत 5 ट्रक जप्त

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पाच ट्रकवर जप्तीची कारवाई केली आहे. तसेच ट्रक मालकांना 3 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

गडचिरोलीत क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतूक करणारे 5 ट्रक जप्त
गडचिरोलीत क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतूक करणारे 5 ट्रक जप्त

By

Published : Apr 18, 2021, 10:37 AM IST

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यात क्षमतेपेक्षा अधिकची रेती वाहतूक केल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पाच ट्रकवर जप्तीची कारवाई केली आहे. तसेच ट्रक मालकांना 3 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सापळा रचून केली कारवाई

सिरोंचा-आसरअल्ली राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सिरोंचा तालुक्यातील प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या तिन्ही नद्यांवर पूल झाल्यानंतर अवैध रेती वाहतूकीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. सिरोंचामधून छत्तीसगडच्या ट्रकमधून तेलंगणात अवैधपणे रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक एस. एन. उचगावकर, वाहन चालक संजय शिरके यांनी शनिवारी सिरोंचा-आसरअल्ली राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. दरम्यान रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणा-या 5 ट्रकवर कारवाई करून अंदाजे 3 लाखाचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे ट्रक चालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. सर्व पाचही ट्रक सिरोंचा येथील पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहेत. पुढील कारवाई मोटर वाहन निरीक्षक एस एन उचगावकर RTO करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details