गडचिरोली - जिल्ह्यातील कोरानाबाधित रूग्णांपैकी आज (बुधवार) 8 रूग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे ही संख्या 508 वर पोहोचली आहे. तर आज बुधवारी नवीन 23 कोरोनाबाधित आढळून आले.
गडचिरोली जिल्ह्यात 508 रूग्ण कोरोनामुक्त, नवीन 23 बाधित
कोरोनाबाधित आढळून आलेल्यांमध्ये एसआरपीएफचे एकूण 18 जवान असून यामध्ये कोरची येथील 11 व एटापल्ली येथील 7 जवान आहेत. त्यानंतर अहेरी येथील संस्थात्मक विलगीकरणातील 3, धानोरा येथील कोरोना कोविड सेंटरमधील 1 व जिल्हा सामान्य रूग्णालयातील 1 कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.
आज (बुधवार) कोरोनाबाधित आढळून आलेल्यांमध्ये एसआरपीएफचे एकूण 18 जवान असून यामध्ये कोरची येथील 11 व एटापल्ली येथील 7 जवान आहेत. त्यानंतर अहेरी येथील संस्थात्मक विलगीकरणातील 3, धानोरा येथील कोरोना कोविड सेंटरमधील 1 व जिल्हा सामान्य रूग्णालयातील 1 कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 158 झाली. तर एकुण बाधित संख्या 667 झाली. आत्तापर्यंत एकूण 508 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषयक चाचण्या करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत 19 हजार 148 जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. याबाबत अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री यांनी दिलेल्या माहितीनूसार आरटीपीसीआर 12125, ट्रुनॅट 1032, एन्टीजीन 5991 तपासण्यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत 19148 तपासण्यांमध्ये 665 रूग्ण आढळून आले आहेत तर दोन जणांची तपासणी जिल्हयाबाहेर झाली होती. सद्या 87 संभावित रूग्णांच्या तपासणीचे अहवाल येणे बाकी आहे.