महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक..! गडचिरोलीमधील पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होवून परतले घरी - covid 19 patient discharged

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28 एवढी होती. त्यापैकी 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. उर्वरित 23 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील सर्व रुग्ण उपचारास चांगला प्रतिसाद देत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

gadchiroli covid 19
गडचिरोलीमधील पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होवून घरी परतले

By

Published : May 28, 2020, 10:02 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यात सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झालेले पाच रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या पाचही रुग्णांना आज गुरुवारी टाळ्यांच्या गजरात घरी सोडण्यात आले. आता गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे 23 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दिलासादायक..! गडचिरोलीमधील पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होवून घरी परतले

गुरुवारी बरे झालेल्या रुग्णांमध्ये कुरखेडा येथील पहिले चार रुग्ण व चामोर्शी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण 18 व 19 मे दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले होते. आज ते कोरोनामुक्त झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते त्यांना कोरोनामुक्त झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे व इतर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पाचही रुग्ण रुग्णवाहिकेने स्वतः च्या घरी रवाना झाले. त्यांना आता यापुढे सात दिवस गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुढील सात दिवस आरोग्य विभागाकडून त्यांच्या घरीच त्यांच्या लक्षणांबाबत निरीक्षणे नोंदवली जाणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28 एवढी होती. त्यापैकी 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. उर्वरित 23 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील सर्व रुग्ण उपचारास चांगला प्रतिसाद देत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात बाहेरून आलेल्या आपल्याच लोकांना कोरोना संसर्ग झालेला आहे आणि त्यातील रूग्ण बरे होण्यास सुरुवातही झाली आहे. नागरिकांनी न घाबरता बरे झालेल्या रुग्णांना स्वीकारले पाहिजे. आता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे संसर्गाचा धोका राहिलेला नाही. मात्र, पुढील सात दिवस खबरदारी म्हणून त्यांना वेगळे राहू द्या. याबाबत रुग्णांनाही सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील उर्वरीत 23 रुग्णही लवकरच अशाप्रकारे बरे होऊन आपापल्या घरी जातील, हा विश्वास जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या सर्व रुग्णांना सॅनिटेशन व गृह विलगीकरणाचे किट देण्यात आले आहे. त्यांना आता घरी खबरदारी म्हणून, सात दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. उपचारादरम्यान रुग्णालयातील सर्व डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांची चांगली काळजी घेतली. सर्व नागरिकांनी आता कोरोना रुग्णांबरोबर नव्हे, तर कोरोना आजाराशी लढायचं आहे. आपला जिल्हा पुन्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करूया, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details