गडचिरोली- अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या एका खासगी अनुदानीत आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकावर पोस्को अंतर्गत कुरखेडा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बेनुदास देशमुख असे आरोपीचे नाव असून तो कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील महादेवगड आश्रमशाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. तो सद्या फरार आहे.
गडचिरोलीत आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाकडूनच विद्यार्थिनीचा विनयभंग
बेनुदास देशमुख असे आरोपीचे नाव असून तो कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील महादेवगड आश्रमशाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. तो सद्या फरार आहे.
मुख्याध्यापक बेनुदास देशमुख याने ४ आॅगस्टला पीडित विद्यार्थिनीच्या घरी जाऊन ती एकटीच असल्याचे पाहून तिचा विनयभंग केला. पीडितेने झालेली घटना सायंकाळी आपल्या आईजवळ सांगितली. आईवडील अशिक्षित असल्याने त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे मार्गदर्शन घेऊन पीडितेच्या आईने यासंबंधीची तक्रार १२ आॅगस्टला कुरखेडा पोलीस ठाण्यात दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेत कुरखेडा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच मुख्यध्यापक फरार झाला आहे.