गडचिरोली - जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत महिला नक्षलवादीला ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 जवानांना यश आले आहे.
बुधवारी गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान एटापल्ली तालुक्यातील जारावंडी लगतच्या गुलांडा जंगलात अभियान राबवित होते. तेव्हा त्यांची लपून बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत गावालगत चकमक उडाली. या चकमकीत प्लाटुन दलमच्या महिला नक्षलवादीला कंठस्नान घालण्यात पोलिसांनी यश मिळवले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले.