महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही; कृषीमंत्र्यांनी दिला विश्वास - dada bhuse news in gadchiroli

राज्यातील खरीप व रब्बी हंगामादरम्यान कोणत्याही शेतकऱ्याला आवश्यक बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी शनिवारी गडचिरोली येथे दिला.

Farmers will not be deprived of seeds and fertilizers says dada bhuse
शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही; कृषीमंत्र्यांनी दिला विश्वास

By

Published : Jul 4, 2020, 9:59 PM IST

गडचिरोली - राज्यातील खरीप व रब्बी हंगामादरम्यान कोणत्याही शेतकऱ्याला आवश्यक बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी शनिवारी गडचिरोली येथे दिला. ते वडसा तालुक्यातील नैनपूर येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते.

शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही; कृषीमंत्र्यांनी दिला विश्वास

दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन प्रत्यक्ष बांधावर जावून, कृषी विषयक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. त्यानिमित्त आज (शनवार) कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन नैनपूर येथे करण्यात आले होते. यावेळी नैनपूर गावचे शेतकरी गजेंद्र ठाकरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही; कृषीमंत्र्यांनी दिला विश्वास
राज्यात खरीप हंगामात 16 लक्ष क्वींटल बियाणांची आवश्यकता आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्यात 17 लक्ष बियाणांची व्यवस्था केली आहे. राज्यात ७० टक्के पेरण्या झालेल्या आहेत. उर्वरीत पेरण्याही लवकरच पूर्ण होतील, असे मंत्र्यांनी उपस्थितांना माहिती दिली. पिकांची उत्पादकता वाढावी, गुणवत्ता सुधारावी या करीता आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी कृषी संजीवनी सप्ताहा दरम्यान प्रत्यक्ष बांधावर जावून मार्गदर्शन करत आहेत. याचा फायदा तळागाळातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details