महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू; चार दिवसांतील दुसरी घटना - वाघाच्या हल्ला गडचिरोली

पुंडलिक निकुरे हे आज बैल घेऊन आपल्या शेतावर गेले होते. बैल शेजारच्या जंगलात चरत होते, तर निकुरे हे शेतात काम करत होते. एवढ्यात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करुन निकुरे यांना ठार केले.

वाघ
वाघ

By

Published : Aug 19, 2021, 8:20 PM IST

गडचिरोली -शेतावर बैल चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करुन ठार केले आहे. ही घटना आज (गुरूवारी) दुपारच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील भिकारमौशी गावाच्या परिसरात घडली आहे. पुंडलिक मसाजी निकुरे (५५ रा.भिकारमौशी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

चार दिवसांतील दुसरी घटना

पुंडलिक निकुरे हे आज बैल घेऊन आपल्या शेतावर गेले होते. बैल शेजारच्या जंगलात चरत होते, तर निकुरे हे शेतात काम करत होते. एवढ्यात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करुन निकुरे यांना ठार केले. यावेळी आजूबाजूच्या शेतात असलेल्या नागरिकांनी गावात येऊन ही बाब सांगितली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठले असता निकुरे यांचा मृतदेह आढळून आला. वाघाने शेतापासून दोनशे मीटर अंतरापर्यंत मृतदेह फरफटत नेला होता. घटनेची माहिती मिळताच चातगाव वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वाघाने नागरिकाला ठार करण्याची ही चार दिवसांतील दुसरी घटना आहे. स्वातंत्र्यदिनी चुरचुरा येथील डंबाजी डोंगरे नामक शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते. या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा -नागपूर पोलिसांनी परत पाठवलेला अफगाणी नागरिक तालिबानी असल्याचा फोटो व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details