निसर्ग चक्रीवादळाच्या मदतीसाठी जे निकष लावले त्याचप्रमाणे पूरग्रस्तांना मिळणार मदत : विजय वडेट्टीवार - vijay wadettiwar etv bharat interview
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विदर्भातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाईल अशी ग्वाही गडचिरोली दौऱ्यात दिली.
गडचिरोली -कोकणात काही महिन्यांपूर्वी निसर्ग निसर्ग चक्रीवादळ आले. निसर्ग चक्रीवादळ आपद्ग्रस्तांसाठी शासनाने जे निकष लावून तातडीची आर्थिक मदत केली, त्याच निकषाच्या आधारे विदर्भातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली दौऱ्यात दिली. गडचिरोली जिल्ह्यातील महापूरच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा दौर्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधला.