महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

न्यायप्रविष्ट जमिनीच्या वादातून अभियंत्याची निघृण हत्या - जमिनीच्या वादातून अभियंत्याची निघृण हत्या

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील शिवाजी चौकापासून हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर अभियंता असलेले बळवंत चंद्रशेखर गौरकार यांची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली आहे.

बळवंत चंद्रशेखर गौरकार

By

Published : Nov 7, 2019, 1:11 PM IST

गडचिरोली- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील एका अभियंत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शहरातील शिवाजी चौकापासून हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना मंगळवारी रात्री घडली. बळवंत चंद्रशेखर गौरकार (वय ५० रा. जैरामपूर चंद्रपूर) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी 8 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायप्रविष्ट जमिनीच्या वादातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा -सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करू; कोल्हापूरातील शांतता समितीच्या बैठकीत संदेश

बळवंत गौरकार व त्यांचे सहकारी सुरेश कुत्तरमारे स्कुटीवरुन जात असताना त्यांना रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने व लाठीने त्यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी बळवंत यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृताचा भाऊ शालिक गौरकार यांच्या तोंडी तक्रारीवरुन आष्टी पोलिसांनी ८ संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये प्रमोद लखमापुरे, प्रदीप लखमापुरे, कपील रामचंद्र पाल, संजय पोटवार, विनायक पाल, राकेश बेलसरे, सुधील पाल, मोरेश्वर पाल (सर्व रा. आष्टी) यांचा समावेश असून त्यांच्याविरूद्ध कलम ३०२, ३४१/१२० ब, १४७, १४८, १४९ भादंवी, सहकलम १३५ मपोकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details