गडचिरोली -महाराष्ट्रातील नावाजलेल्या पर्यटनस्थळापैंकी एक गडचिरोलीमधील कमलापुरातील हत्ती कॅम्प आहे. या हत्ती कॅम्पमध्ये वनविभागाचे नऊ हत्ती आहेत. त्यातील रूपा नावाच्या हत्तीणीने कुणीही शिकवले नसताना माणसासारखे हापसीला (हातपंप) सोंडेने हापसून पाणी पीताना आढळली आहे. एका पर्याटकाने ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद केली आहे.
दक्षिण गडचिरोली भागातील अहेरी तालुका मुख्यालयापासून 50 किमीवर कमलापूर गाव आहे. येथे उच्चप्रगतीचे साग झाडांचे घनदाट जंगल, मोठा वन तलाव आहे. वनविभागाच्या डोंगरदरऱ्यातून लाकुड खेचून आणण्यासाठी येथे वन विभागाच्या 3 नर व 6 मादा हत्ती आहे. सध्या आधुनिक यंत्रणा पोहोचल्याने हत्तींच्या साहाय्याने मोठ-मोठ्या डोंगरावरुन लाकूड आणण्याचे सध्या बंद केले आहे.