मुंबई-एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांना जर शिक्षा द्यायची असेल तर त्याला गडचिरोलीला पाठविण्याची धमकी दिली जाते. मात्र, अश्विनी सोनवणे यांनी मुलांच्या विकासासाठी स्वतःहून गडचिरोली मागून ( Ashwini Sonawane on Educational experiments ) घेतली. गटशिक्षणाधिकारी म्हणून गडचिरोलीमध्ये त्यांनी तीन वर्ष अतिशय चांगले काम केले. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका त्यांचा यामागचा काय हेतू होता.
प्रश्न- तुम्ही स्वतःहून गडचिरोली मागून घेतले. तिथे जाऊन तुम्ही नेमके काय केले? जाण्यामागे तुमचा काय हेतू होता ?
गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे- खरेतर बऱ्याच वेळेला आपल्याकडे करिअर म्हणजे अमेरिकेला जाणे आणि मोठे पैसे कमविणे वाटते. आम्ही अभय बंग यांच्या व्याख्यानाला जायचो. ते म्हणायचे की जिथे गरज असते तेथे काम करणे म्हणजे करिअर असते. हे विचार मनात होते आणि तेव्हाच तत्कालीन सचिव, तावडे शिक्षणमंत्री होते. त्यांनी विचारले की गडचिरोलीत काम करायला ( Educational officer work in Gadchiroli ) कोण तयार आहे. सचिवांनी माझ्यावर जबाबदारी दिली. ती मी आनंदाने स्वीकारली. मी स्वतःहून भामरागडला काम करण्यास निघून गेले.
प्रश्न - भामरागडमध्ये गेल्यानंतर तिथलं वातावरण कसे होते? तुम्हाला त्याची माहिती होती का ? नक्षलग्रस्त भागात गेल्यानंतर तिथे कसं वाटते?
गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे - खरेतर मी मूळची पुण्याची आहे. औरंगाबादपर्यंत फार तर गेले होते. त्यापुढे कधीही अगदी नागपूरला कधीही गेले नव्हते. पहिल्यांदा 2017 ला गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले. तिथे दळणवळणाच्या सोयी नाहीत. जंगलामध्ये शाळा होत्या. अतिशय दुर्गम भागात कमीत-कमी दोन नाले ओलांडली की एक शाळा येते. अशा भागामध्ये काम करताना मला सगळ्यात पहिल्यांदा जाणवले की येथे माडीया ही स्थानिक भाषा आहे. आपली पुस्तके मराठीमध्ये आहेत. ही भाषा विद्यार्थ्यांसाठी एकदम परकीय भाषेसारखी ( Books in two languages in Gadchiroli ) होती.
सहा वर्षेपर्यंत माडिया भाषेत असतात. पहिलीला एकदम त्यांचा मराठी भाषेशी संबंध येतो. विदेशी भाषेशी असल्यासारखे होते. त्याचा परिणाम असा व्हायचा, की आमचे दहावीचे निकालसुद्धा तीन, चार व पाच टक्के असे त्या वर्षीच्या लागले. हे पाहिल्यानंतर एक लक्षात आले की त्यांना सगळ्यात आधी मदतीचा हात द्यायला पाहिजे. द्विभाषिक पुस्तके तयार केली पाहिजेत. तो प्रस्ताव शिक्षणमंत्री तावडे यांच्यासमोर मांडला. त्यांनी त्याला मंजुरी दिली. पहिल्यांदा आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी द्विभाषिक पुस्तके तयार झालीत. त्याच्यामध्ये चित्र होती. पर्यावरणाशी संबंधित तिथल्या भागाशी संबंधित कविता होत्या. पहिल्यांदा पहिलीच्या पुस्तकातील खूप चांगला परिणाम झाला. विद्यार्थ्यांना पुस्तके आपली वाटली. पहिला मदतीचा हात आणि दिल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ( Gadchiroli students Educational Growth ) व्हायला लागली.
दुसरा होता की तिथे सगळ्या शाळा जंगलात असतात. विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. तर त्यांना सामाजिक गरज असते. कमी पटाच्या शाळा जास्त होत्या. सामाजिककरणासाठी पुणे, मुंबईला समर कॅम्प होतात. मात्र या भागात अशा काही सुविधा नाहीत. वेगवेगळे दिवाळीच्या वेळेला कॅम्प असतात. त्यामुळे मुले एकत्र येतात. तो प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडल्यावर त्यांनी मंजुरी दिली. दिवाळीची सुट्टी आणि मे महिन्यामध्ये विविध प्रकारचे काम सुरू केले. विद्यार्थ्यांच्या रेसिडेन्शिअल काम करायचो. विद्यार्थी एकत्रिपणे चित्रपट बघू शकतील व गाणी म्हणू शकतील यासाठी कॅम्पस घेतले. सामाजिक कौशल्य विकसित होतील, असे आम्ही कॅम्स घेतले. त्याचा खूप चांगला परिणाम झाला. आम्ही केवळ दीडशे विद्यार्थ्यांचा कॅम्प केला होता. मात्र, बुधवार हा भामरागडमध्ये आठवडी बाजाराचा दिवस असतो. त्या दिवशी पालक स्वतःहून येऊन आम्हाला आमच्या मुलांना त्यामध्ये सहभागी करून घ्या म्हणून विचारणा करत होते. प्रत्येक पालकाला वाटते मुलगा शिकला पाहिजे. ती जाणीव त्यांच्यामध्ये आता विकसित व्हायला लागलेली आहे.