महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 16, 2019, 4:13 PM IST

ETV Bharat / state

डॉ. प्रकाश आमटेंना 'लाईफटाईम अचिव्हमेंट मेडल' जाहीर; बिल गेट्स करणार सत्कार

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना लाईफटाईम अचिव्हमेंट मेडलने गौरवण्यात येणार आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते रविवारी (17 नोव्हेंबर)ला नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ.आमटे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना लाईफटाईम अचिव्हमेंट मेडलने गौरवण्यात येणार आहे.

गडचिरोली - ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना लाईफटाईम अचिव्हमेंट मेडलने गौरवण्यात येणार आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते रविवारी (17 नोव्हेंबर)ला नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. आमटे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवेमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव यावेळी होणार आहे. यामध्ये डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सायरस पूनावाला तसेच डॉ. किरण मझूमदार-शॉ या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.

उद्या(दि.१७नोव्हें)ला संध्याकाळी नवी दिल्लीतील आयसीएमआर हॉल येथे हा सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी आमटे दाम्पत्याला मॅगेसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना पद्मश्री देऊन भारत सरकारने गौरविले होते.

जिल्ह्यातील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून ते आरोग्य सेवा देत आहेत. तसेच डॉ. प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानं ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी. लिट) पदवीने देखील सन्मानित केलं आहे.

भामरागड तालुक्यातील हेमलकसा या दुर्गम भागात जाऊन आदिवासी लोकांना ते सेवा पुरवत आहेत. तसेच दुर्लक्षित घटकांना वैद्यकीय सुविधा देऊन आरोग्य विषयक विकास साधनं, शिक्षण प्राणी, अनाथालय, आदी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे. लोक बिरादरी प्रकल्पामार्फत आदिवासी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले असून, यासाठी स्वत:चे संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details