महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किराणा दुकानात वाईन विक्री म्हणजे मुले आणि महिलांना दारूच्या आहारी नेण्याचा प्रकार - डॉ. अभय बंग - dr abhay bang reaction

वाईन विक्रीसंदर्भात घेललेल्या निर्णयाने शेतकऱ्यांचा कोणताही फायदा नाही. उलट किशोरवयीन मुले आणि महिलांना दारूच्या आहारी नेण्याचा हा प्रकार आहे. त्याचा समाजातून निषेध झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग (Dr. Abhay Bang) यांनी दिली.

dr abhay bang
डॉ अभय बंग

By

Published : Feb 4, 2022, 7:36 PM IST

Updated : Feb 4, 2022, 7:57 PM IST

गडचिरोली - राज्य शासनाने वाईन विक्री किराणा दुकानात (Wine Sell at Supermarket) सुरू करताना दिलेला तर्क अतिशय चुकीचा असून, त्यात शेतकऱ्यांचा कोणताही फायदा नाही. उलट किशोरवयीन मुले आणि महिलांना दारूच्या आहारी नेण्याचा हा प्रकार आहे. त्याचा समाजातून निषेध झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग (Dr. Abhay Bang) यांनी दिली.

डॉ. अभय बंग - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
  • वाईन विक्रीसंदर्भातला निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही - बंग

वाईन निर्मितीसाठी लागणारी फळे ही केवळ दोन-तीन जिल्ह्यात होतात. त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, हा तर्क खोटा आहे. यापासून मिळणाऱ्या महसुलातील केवळ 5 टक्के रक्कम शेतकऱ्यांना, तर उर्वरित 95 टक्के पैसा व्यापारी आणि सरकारला मिळणार आहे. हा फळांचा रस आहे, असाही तर्क दिला जात आहे. तसे असेल तर सत्तेतील नेते आपल्या नातवांना हा फळांचा रस पाजणार आहेत का? हा केवळ फळांचा रस असेल तर त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या परवान्याची गरज कशाला? असे प्रश्नही बंग यांनी उपस्थित केले. मुळात किराणा दुकानात वाईन ठेवण्याची परवानगी देऊन शासनाने ती घरोघरी पोचवण्याची सोय केली आहे. या नीतीचा समाजातील सर्व स्तरातून निषेध व्हायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  • राज्य सरकारने काढला अध्यादेश -

किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तू मिळण्याच्या ठिकाणी म्हणजेच सुपर मार्केटमध्येसुद्धा वाईन विक्री (Wine Selling) केली जाणार आहे. पण त्यासाठी किराणा दुकान हे एक हजार चौरस फुटापेक्षा मोठे असले पाहिजे ही अट घालण्यात आली आहे. दुकानात यासाठी एक शोकेस बनवून वाईन विक्री करता येणार आहे, असे सरकारने अध्यादेशात म्हटले आहे.

Last Updated : Feb 4, 2022, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details