गडचिरोली - लॉकडाऊनचा फायदा घेत गावठी आणि विदेशी दारूची विक्री करणार्यांवर तसेच दारू गाळणार्यांच्या भट्ट्यांवर मुक्तीपथ तालुका चमू आणि सिरोंचा पोलिसांनी धाड टाकली. मोठ्या प्रमाणात दारू आणि सडवा नष्ट केला. सोबतच काही विक्रेत्यांकडून विदेशी दारूही जप्त केली.
लॉकडाऊन काळात दारू गाळणार्या हातभट्ट्यांवर गडचिरोली पोलिसांचे छापे
सिरोंचा शहरासह तालुक्यात तेलंगणातून अनेक मार्गाने विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. पण लॉकडाऊनमुळे या तस्करीचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. परिणामी शहरात गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. लोकांनी याचे काटेकोर पालन करावे यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने प्रयत्न करीत आहे. पण ही संचारबंदी पायदळी तुडवत सिरोंचा तालुक्यातील काही गावांमध्ये दारूविक्रेते मोठ्या प्रमाणात मोहा आणि गुळाची दारू गाळून त्याची इतरत्र विक्री करीत आहे. गाव संघटनांकडून ही माहिती मुक्तिपथ तालुका चमूला मिळताच त्यांनी रामांजपूर, जानमपल्ली माल, नंदीगाव आणि आणि रंगयापल्ली येथे पोलिसांच्या सहकार्याने धाड मारून मोठ्या गावठी दारू नष्ट करून दारूभट्ट्या उद्द्वस्थ केल्या. मोहा आणि गुळाचा सडवा टाकलेले ड्राम नष्ट केले. सोबतच विदेशी दारूही जप्त केली.
सिरोंचा शहरासह तालुक्यात तेलंगाणातून अनेक मार्गाने विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. पण लॉकडाऊनमुळे या तस्करीचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. परिणामी शहरात गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. हे निदर्शनास येताच मुक्तिपथ आणि पोलिसांनी शहरातील चार प्रभागात धाडसत्र राबवून सहा जणांच्या घरून गावठी आणि विदेशी दारूचे साठे जप्त केले. लॉकडाऊन संपताच दारूविक्री करणार्या ११ जणांवर कारवाई केली जाणार आहे. पोलीस निरीक्षक अजय अहीरकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे आणि शीतल दविली यांनी ही कारवाई केली. कोरोंनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी संचारबंदी पाळून अवैध धंदे बंद करण्यासही त्यांनी सांगितले.