गडचिरोली - नक्षलवाद्यांनी दायसिंग अंकलू बोगा याची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना धानोरा तालुक्यातील गॅरापती पोलीस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या वडगाव येथे घडली. दायसिंग हा नक्षली यशवंत बोगा याचा लहान भाऊ आहे. यशवंतने आत्मसमर्पण केले. त्याच्या आत्मसमर्पणाला लहान भाऊ दायसिंग हा जबाबदार असल्याचे गृहीत धरून नक्षलवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.
...म्हणून आत्मसमर्पीत नक्षलवाद्याच्या लहान भावाची नक्षलवाद्यांकडून हत्या - नक्षलवादी यशवंत बोगा आत्मसमर्पण
नक्षलवाद्यांनी दायसिंग अंकलू बोगा याची गोळ्या झाडून हत्या केली. दायसिंगच्या सांगण्यावरून त्याचा भाऊ नक्षलवादी यशवंत बोगा याने आत्मसमर्पण केल्याचे नक्षलवाद्यांनी गृहीत धरले. यामुळे यशवंतचा लहान भाऊन दायसिंगचा नक्षलवाद्यांनी काटा काढला.
gadchiroli
दायसिंग अंकलू बोगा हा वडगाव येथील त्याच्या घरी होता. 19 मे रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास 8 ते 10 नक्षलवादी अचानक त्याच्या घरी आले. गोळ्या झाडून दायसिंगची हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात नक्षल्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -पीपीई किटमधील घामापासून सुटका; पुण्याच्या निहालचे कोव्ह-टेक व्हेटिलेशन ठरतेय प्रभावी