गडचिरोली - नक्षल प्रभावित ग्रामीण भागात सीआरपीफचे अधिकारी एम.एच. खोब्रागडे आणि मदन क्रुष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी कृती कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय उपक्रम सुरु आहे. या नागरिक सहाय्य उपक्रमातून परिसरातील नागरिकांचा नक्षलवादापासून भ्रमनिरास होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणे, अपेक्षित आहे. त्याअंतर्गत सीआरपीएफ 37 बटालियन च्या वतीने भामरागड येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ( CRPF Volleyball Tournament ) होते.
भामरागड ग्रामीण युवकांसाठी सीआरपीएफ 37 बटालियनच्या वतीने भामरागड पोलीस स्टेशनच्या मैदानावर व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्या संघाना शिल्ड आणि प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. भामरागड सारख्या अतिदुर्गम भागातील ग्रामीण मुलांमध्ये क्रीडा स्पर्धांची आवड निर्माण करणे हा या मागचा उद्देश आहे.