गडचिरोली - जिल्ह्यात कार्यरत आणखी एका सीआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी घडली. दीपक कुमार (वय २७) असे मृत जवानाचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलीस ठाण्यात तैनात होता. मृत जवान उत्तराखंड राज्यातील रहिवासी आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत आणखी एका सीआरपीएफ जवानाची आत्महत्या - गडचिरोलीत सीआरपीएफ जवानाची आत्महत्या
दीपक कुमार हा केंद्रीय राखीव दलाच्या बटालियन क्रमांक ३७ मध्ये कार्यरत होता. रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्याने स्वत:कडील बंदुकीतून आपल्या छातीत गोळी घातली.
दीपक कुमार हा केंद्रीय राखीव दलाच्या बटालियन क्रमांक ३७ मध्ये कार्यरत होता. रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्याने स्वत:कडील बंदुकीतून आपल्या छातीत गोळी घातली. मृत्युपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. घटनेनंतर त्याचा मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात येत आहे.
तत्पूर्वी २२ एप्रिलच्या रात्री धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्रात चंद्रकांत शिंदे या राज्य राखीव दलाच्या पोलीस उपनिरीक्षकाने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच आज लाहेरीत एका जवानाने आपली जीवनयात्रा संपवली. मानसिक तणावामुळे पोलीस विभागात असे प्रकार अधूनमधून घडत असतात, याची प्रचिती अनेकदा आली आहे.