गडचिरोली - महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्रशिक्षण विभागामार्फत '' उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ गडचिरोली '' हा उपक्रम 4 फेब्रुवारी 2021 सकळी 12 गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण विभागातील मंत्रालय व संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे विद्यापीठात प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडी-अडचणी ऐकून घेऊन सोडविणार आहेत.
अडचणी मांडण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाद्वारे विशेष पोर्टलची निर्मिती - Gondwana University news
गोंडवाना विद्यापीठाने सर्व संबंधित घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या www.unigug.ac.in या वेवसाइटच्या मुख्य पृष्ठावर ''उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय@गडचिरोली'' हे विशेष पोर्टल निर्माण केलेले आहे.
इंग्रजी अथवा मराठीतून मांडता येणार प्रश्न
गोंडवाना विद्यापीठाने सर्व संबंधित घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या www.unigug.ac.in या वेवसाइटच्या मुख्य पृष्ठावर ''उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय@गडचिरोली'' हे विशेष पोर्टल निर्माण केलेले आहे. येथे नागरिकांना इंग्रजी अथवा मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार आहे. निवेदनाची सॉफ्ट कॉपी जोडण्याची व्यवस्थाही येथे आहे. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांना आपली निवेदने ऑनलाइन सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्यांना ऑनलाइन निवेदन सादर करणे शक्य होणार नाही, त्यांनाही उपस्थित राहून मंत्री महोदयांना आपले निवेदन सादर करता येणार आहे.