गडचिरोली - राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यात रस्त्याच्या कामावर शुक्रवारी नक्षली बॅनर आढळले. रस्ता कामाचा दर्जा चांगला नसून सदर काम बंद करा, असा धमकीवजा उल्लेख बॅनरवर केला आहे. त्यामुळे या परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे.
गडचिरोली : रस्त्याच्या कामावर आढळले नक्षली बॅनर; दर्जाहीन काम बंद करण्यासाठी धमकी - गडचिरोली सिरोंचा भाकप माओवादी न्यूज
सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर सिरोंचापासून केवळ 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंटीपाका चेक गावापासून जवळपास 800 मीटर अंतरावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी सुरू असलेले काम बोगस असल्याचे सांगून काम बंद करा, अशी एक प्रकारची धमकी दिली आहे. सिरोंचा तालुका मुख्यालय लगतच नक्षली बॅनर आढळल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
'बोगस काम बंद करो, इसका अंजाम मिलेगा'चा उल्लेख
सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर सिरोंचापासून केवळ 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंटीपाका चेक गावापासून जवळपास 800 मीटर अंतरावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी सुरू असलेले काम बोगस असल्याचे सांगून काम बंद करा, अशी एक प्रकारची धमकी दिली आहे. सिरोंचा तालुका मुख्यालय लगतच नक्षली बॅनर आढळल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. लावलेल्या बॅनरवर 'बोगस काम बंद करो, इसका अंजाम मिलेगा' असा उल्लेख आहे आणि खाली भाकप माओवादी असे लिहिले आहे.