गडचिरोली - जिल्ह्यात गुरुवारी 328 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात 145 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आत्तापर्यंत 11 हजार 68 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या 2 हजार 343 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
गडचिरोलीत गुरुवारी नऊ मृत्यूसह 328 नवीन कोरोना बाधितांची नोंद - गडचिरोली कोरोना आढावा
आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 174 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.47 टक्के आहेत. तर सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.25 टक्के तर मृत्यू दर 1.28 टक्के इतका आहे. दिवसभरात 328 बाधित रुग्ण आढळले.
आतापर्यंत 174 जणांचा मृत्यू
आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 174 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.47 टक्के आहेत. तर सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.25 टक्के तर मृत्यू दर 1.28 टक्के इतका आहे. दिवसभरात 328 बाधित रुग्ण आढळले. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 145, अहेरी तालुक्यातील 32, आरमोरी 24, भामरागड तालुक्यातील 23, चामोर्शी तालुक्यातील 19, धानोरा तालुक्यातील 06, एटापल्ली तालुक्यातील 14, कोरची तालुक्यातील 07, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 14, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 8 तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये 28 जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 145 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 35, अहेरी 14, आरमोरी 07, भामरागड 21, चामोर्शी 22, धानोरा 06, एटापल्ली 01, मुलचेरा 05, सिरोंचा 07, कोरची 05, कुरखेडा 07, तसेच वडसा 15 येथील जणाचा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील बाधितांमध्ये 5 जणांचा समावेश आहे.