गडचिरोली -आज जिल्हयात १६७ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ५५९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित २५६१२ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २१२९० वर पोहचली. तसेच सद्या ३७६५ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात कोरोना स्थिती दिलासादायक - गडचिरोली कोरोना
आज जिल्हयात १६७ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ५५९ जणांनी कोरोनावर मात केली.यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.१३ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १४.७० टक्के तर मृत्यू दर २.१७ टक्के झाला आहे.
आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ५५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज १५ नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील ८१ वर्षीय पुरुष, ता. धानोरा जि. गडचिरोली येथील ६३ वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील ३५ वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील ७५ वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील ४३ वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील ४० वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील ५० वर्षीय पुरुष, ता. नागभिड जि. चंद्रपूर येथील ७० वर्षीय महिला, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील ६५ वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील ६५ वर्षीय पुरुष, ता. वडसा जि.गडचिरोली येथील ७५ वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील ३६ वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील ८५ वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील ४० वर्षीय महिला, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील ६० वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.१३ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १४.७० टक्के तर मृत्यू दर २.१७ टक्के झाला आहे.
नवीन १६७ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १०४, अहेरी तालुक्यातील ८, आरमोरी ५, भामरागड तालुक्यातील ०, चामोर्शी तालुक्यातील २१, धानोरा तालुक्यातील ५, एटापल्ली तालुक्यातील ०, कोरची तालुक्यातील २, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये ४, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ८, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ४ तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये ६ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ५५९ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील १८१, अहेरी ४७, आरमोरी ५३, भामरागड ८, चामोर्शी ३८, धानोरा २१, एटापल्ली ३१, मुलचेरा २९, सिरोंचा २७, कोरची २२, कुरखेडा २८ तसेच वडसा येथील ७४ जणांचा समावेश आहे.
हेही वाचा-कोविडविषयी बातम्यांसंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली