महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 11, 2021, 3:17 PM IST

ETV Bharat / state

Nature Safari In Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या निसर्ग सफारीस प्रारंभ

गडचिरोली जिल्ह्यात राखीव जंगलातील (Gadchiroli District Reserve Forest) पहिल्या निसर्ग सफारीची (Nature Safari Started In Gadchiroli) आज सुरुवात झाली. वनविभागाच्या वतीने (Forest Department) 58 किलोमीटर लांबीच्या गुरवळा निसर्ग सफारीचा (Gurvala Nature Safari) प्रारंभ करण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमींना पर्यटनाचा नवा पर्याय (New Option For Tourism) खुला झाला आहे.

गडचिरोली
गडचिरोली

गडचिरोली :गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) एकेकाळी संपन्न वन्यजीव समृद्धीने ओळखला जात होता. मात्र गेल्या काही वर्षात इथल्या हिंसक चळवळीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात वन्यजीव लुप्त होत गेले. मात्र आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील जंगलात वाघ -बिबटे- नीलगायी व अन्य वन्यजीव दर्शन देऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरापासून (Gadchiroli Cty) दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरवळा जंगलात (Gurvala Forest) वनविभागाच्या वतीने पहिल्या निसर्ग पर्यटन सफारीची सुरुवात (Nature Tourism Safari) करण्यात आली आहे. गुरवळा येथील राखीव जंगलात चौदा आकर्षक ठिकाणांना जोडून 58 किलोमीटरची ही निसर्ग सफारी पर्यटकांना विविध आकर्षणाची केंद्रे व वन्यजीव दर्शन घडविणार आहे. सफारीची सुरुवात जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार (ZP President Ajay Kankadalwar) यांच्या हस्ते करण्यात आली. या भागात केवळ जंगलावर गुजराण असलेल्या स्थानिकांना या नव्या प्रयोगामुळे रोजगार मिळेल अशी अपेक्षा वनविभागाने व्यक्त केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या निसर्ग सफारीस प्रारंभ
सर्वोतोपरी सहाय्य करणार

वनसमृद्ध असलेला हा जिल्हा सोयी नसल्याने आजवर दुर्लक्षित होता. मात्र आता वन्यजीव वैविध्य दिसू लागल्याने अशा पद्धतीच्या निसर्ग पर्यटन सफारी अधिक संख्येत तयार व्हाव्यात यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. या पर्यटन सफारी दरम्यान पर्यटकांना मोर -हरिण- नीलगाय व इतर वन्यजीवांचे दर्शन झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

पर्यटनात नवा अध्याय

गडचिरोली जिल्ह्यात विविध राखीव जंगलात अशा पद्धतीने नियोजनबद्ध निसर्ग पर्यटन सफारी उभारण्याची वनवभागाची योजना आहे. कोरोना काळात या प्रयत्नांना खीळ बसली होती. मात्र आता व्याघ्रदर्शन घडविणारी व वन्यजीव वैविध्य सांगणारी सफारी सुरु झाल्याने गडचिरोलीकरांच्या पर्यटनात नवा अध्याय जोडला गेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details