गडचिरोली -जिल्ह्यात ( Torrential Rains in Gadchiroli ) सध्या पूर परिस्थिती ( Gadchiroli flood situation ) निर्माण झालेली आहे. पूर परिस्थितीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेले आहे. याच स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis ) गडचिरोलीत दाखल झाले आहे. त्यांनी जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावरील पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाण्याची पातळी आणि उपाययोजनांची माहिती दिली आहे.
'या' तालुक्याला फटका :जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाने कहर केला असून याचा सर्वाधिक फटका दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आहेरी तालुक्याला बसला आहे. मुख्यालय मार्गावरील नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतुक ठप्प झाली तर गडचिरोलीला आजपासुन पुढील तीन दिवस हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. भामरागड आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर पेरमिली गावाजवळच्या नाल्यावरुन एक ट्रक व तीन प्रवासी पुरात वाहुन गेले आहेत. चालकांचा शोध चालू आहे. भामरागड आलापल्ली मार्गावरील कुमरगुडा नाल्यावरील नवीन ब्रीज बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी पर्याय मार्ग वाहुन गेल्याने स्थानिक प्रशासानाकडुन युध्द पातळीवर दुरुस्ती करुनही तीन दिवसांत तीनदा वाहने वाहुन गेली आहे. तीन दिवसापासून दिवसभर वाट बघत नाल्यावर अडकून पडले आहेत. तर ग्रामस्थासमोर जीव मुठीत धरुन नाला पार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील 60 ते 70 गावांना संपर्क तुटण्याची भीती आहे. कायमची उपाय योजना आखण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश :आम्ही स्थानीय प्रशासनाला पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांची कुठल्याही जीवित आणि मालमत्तेची हानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासंबंधी एनडीआरएफ, नेव्ही, आर्मी, एअर फोर्स यांचे सहकार्य घेऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहचवण्याचे कार्य चालू आहे. आम्ही या संदर्भात एनडीआरएफ, नेव्ही, आर्मी, एअर फोर्स यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती :