महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी गडचिरोली नगरपालिकेवर धडक मोर्चा - Citizens of gadchiroli march on municipality

शहरातील अतिक्रमण धारकांना त्वरित पट्टे देण्यात यावे, रखडलेली घरकुल योजना सुरू करावी, गृह करांच्या रकमेत कपात करावी, पिण्याच्या शुद्ध पाण्याची त्वरित उपाययोजना करावी, अशा प्रकारच्या विविध 18 मागण्यांचे निवेदन यावेळी मुख्याधिकारी संजीव ओव्हाळ यांना देण्यात आले.

gadchiroli
विविध मागण्यांसाठी गडचिरोली नगरपालिकेवर नागरिकांचा धडक मोर्चा

By

Published : Jan 11, 2020, 8:16 AM IST

गडचिरोली - शहरातील नागरिकांनी आपल्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी गडचिरोलीच्या नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. शहरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासले आहे. परंतु, पालिका प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

विविध मागण्यांसाठी गडचिरोली नगरपालिकेवर नागरिकांचा धडक मोर्चा

हेही वाचा -पोलिसांकडून प्लास्टिक आणि व्यसनमुक्तीचा संदेश; तंबाखूजन्य पदार्थांची होळी

शहरातील अतिक्रमण धारकांना त्वरित पट्टे देण्यात यावे, रखडलेली घरकुल योजना सुरू करावी, गृह करांच्या रकमेत कपात करावी, पिण्याच्या शुद्ध पाण्याची त्वरित उपाययोजना करावी, अशा प्रकारच्या विविध 18 मागण्यांचे निवेदन यावेळी मुख्याधिकारी संजीव ओव्हाळ यांना देण्यात आले. या मोर्चाला इंदिरा गांधी चौक येथून सुरुवात झाली. हातात फलक घेऊन घोषणाबाजी देत मोर्चेकरी नगरपालिकेवर धडकले. यावेळी नगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला. या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला.

हेही वाचा -नक्षलवाद्यांच्या दहशतीत आजही भरते सुरजागडची यात्रा

काय आहेत मोर्चेकऱ्यांच्या मागण्या

1) गोकुलनगर, चनकाईनगर, विवेकानंदनगर, रामनगर, इंदिरानगर, लांझेडा येथे अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमण धारकांना त्वरीत जागेचे पट्टे देण्यात यावे.
2) गेल्या 2 वर्षांपासून रखडलेली शहरातील घरकुल योजना त्वरीत कार्यान्वित करण्यात यावी आणि मंजूर झालेल्या घरकुल धारकांचे बांधकाम त्वरीत चालू करण्यात यावे.
3) 35 वर्षांआधी घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या लाभधारकांची घरे जीर्ण झाली असून त्यांना विनाअट घरकुल मंजूर करण्यात यावे.
4) 2019-20 गृहकर 10 टक्के वाढविण्यात आले ते वाढीव कर त्वरीत रद्द करण्यात यावे आणि पाणीपट्टी कमी करण्यात यावी.
5) शहरातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व शुध्द पाणी मिळण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी आणि सर्व नळ धारकांच्या नळाच्या पाण्याचे नमुने घेऊन लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात यावे.
6) मागील 20 वर्षांपासून नगर परिषदेमार्फत साफ-सफाईचे काम करणाऱ्या कामगारांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे.
7) शहरातील प्रत्येक वार्डात दर महिन्याला आरोग्य शिबीर राबवून विनामूल्य उपचार करण्यात यावे.
8) भूमिगत गटारलाईनच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शहरवासियांनी केला असून याची सीबीआयमार्फत चौकशी करून दोषी अधिकारी आणि नगर परिषदेतील पदाधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
9) भूमिगत गटाराची पाईप लाईन टाकून झालेले रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण केल्याशिवाय तोपर्यंत दुसऱ्या वार्डातील खोदकाम करू नये.
10) शहरातील खुल्या जागांचे सुशोभीकरण तत्काळ करण्यात यावे.
11) शहरातील आरक्षित जागेचे आरक्षण काढणे त्वरीत थांबविण्यात यावे.
12) फुटपाथ धारकांना व्यवसायासाठी दुकानाच्या गाळ्याची व्यवस्था करून त्यांना व्यवसायासाठी अल्पदरात गाळे उपलब्ध करून देण्यात यावे.
13) गडचिरोली शहराचे हृदय असलेल्या इंदिरा गांधी चौकात महात्मा गांधींचे व आय.टी.आय. समोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभे करून चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे.
14) शहरातील प्रत्येक मेन रोडवर व आठवडी बाजारात शौचालय उभारून त्याची साफसफाई व देखरेख स्वतः नगर परिषदेने करावी.
15) शहरातील नाल्या दर आठवड्याला साफ करण्यात यावे व गाळाची उचल विना-विलंब करण्यात यावी.
16) कारगील चौकातून तलावाच्या खालून वखार महामंडळ ते विज्ञान महाविद्यालयकडे जाण्याने रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करण्यात यावे.
17) नगर परिषदेच्या शाळेत इंग्लिश मीडियम शिक्षणाची सुविधा त्वरीत उपलब्ध करण्यात यावी.
18) शहरातील कैकाडी समाज गेल्या 20 वर्षापासून चामोर्शी रोडलगत वास्तव्याला आहे. त्यांचे गृहकर त्वरीत लावून शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा. तसेच नगर परिषदेने या वस्तीत प्राथमिक शाळा त्वरीत चालू करावीत मूलभूत गरजा पूरविण्यात याव्या.

ABOUT THE AUTHOR

...view details