महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीतील चामोर्शी शहर बनले कोरोना 'हॉटस्पॉट'; पुन्हा आढळले 29 रुग्ण

शनिवारी 3 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 232 झाली. तर कोरोनामुक्त रूग्णांची आकडेवारी 854 झाली.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 29, 2020, 10:21 PM IST

गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी शहर कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे. सतत तीन दिवस 90 रूग्ण आढल्यानंतर शनिवारी चामोर्शी शहरात नवे 21 तर जिल्ह्यात 29 रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 87 वर पोहोचली आहे.

शनिवारी 3 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 232 झाली. तर कोरोनामुक्त रूग्णांची आकडेवारी 854 झाली. आज नवीन बाधितांमध्ये चामोशी येथील प्रतिबंधात्मक क्षेत्रातील 21 जण बाधित आढळले. यात 289 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 17 जण आंबेडकर वार्डातील व नगर पंचायत क्षेत्रातील 4 जण बाधित आढळून आले. अहेरी येथील २ बांधकाम व्यावसायिक छत्तीसगड येथून आलेले कोरोना बाधित आढळून आले.

गडचिरोली येथील 5 जण यामध्ये 1 कैदी व 1 पोलीस यवतमाळवरुन आलेले कोरोना बाधित आढळून आले. नागपूर वरून आलेला 1 तर 2 सामान्य रूग्णालयातील रूग्णांचा समावेश आहे. तसेच 1 जण सिरोंचा येथील असून बाधित रूग्णाच्या संपर्कातील आहे. तर कोरची येथील 2 व गडचिरोली येथील 1 असे 3 जण आज कोरोनामुक्त झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details