गडचिरोली - तेलंगणा राज्यातून महाराष्ट्राच्या सीमेलगत आलेल्या दोन वाहनांमध्ये दोन कोटी वीस लाखांची रक्कम आढळली आहे. ही रक्कम नक्षलवाद्यांना पोहोचविण्यासाठी भामरागडला नेण्यात येत होती, असे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. सिरोंचा पोलिसांनी या प्रकरणी तेलंगणाच्या आणखी दोन बड्या कंत्राटदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
नक्षलवाद्यांना निधी पुरविल्याप्रकरणी तेलंगणाच्या दोन बड्या कंत्राटदारांसह चौघांवर गुन्हा - Gadchiroli news update
तेंदुपत्ता तोडण्याचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटराकडून नक्षलवाद्यांना देण्यासाठी ही रक्कम नेण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासातून पोलिसांना मिळाली. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये तेलंगणाच्या बड्या कंत्राटदारासह चौघांविरुद्ध सिरोंचा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 4 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सिरोंचा पोलिसांनी मंगळवारी (दि. 2 जून) सकाळच्या सुमारास प्राणहिता व गोदावरी नदीच्या पुलावर नाकाबंदी केली. यावेळी तेलंगणा राज्याकडून आलेल्या दोन वाहनांची तपासणी केली असता, त्या वाहनांमध्ये दोन पिशव्यांमध्ये रक्कम असल्याचे निदर्शनास आले. याबाबत वाहनचालकांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला. पोलिसांनी दोन मोटारी (क्र. एम एच 34, बी एफ 7221) आणि (टी एस 11 पी एन 0001) जप्त करून दोघांनाही अटक केली. संजय गंगाराम अवथरे (रा. आष्टी) व सुधीर पत्रु राऊत, अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या चौकशीनंतर दोन कंत्राटदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध आहेत. अटकेतील आरोपी सध्या प्राप्तिकर विभागाच्या ताब्यात आहेत. चौकशीअंती त्यांना पुन्हा पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.
तेंदुपत्ता तोडण्याचे कंत्राट घेणाऱ्या दोन कंत्राटरांकडून नक्षलवाद्यांना देण्यासाठी ही रक्कम नेण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये तेलंगणाच्या दोन बड्या कंत्राटदारांसह चौघांविरुद्ध सिरोंचा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 4 जून) गुन्हा दाखल करण्यात आला. नोटाबंदीच्या काळातही पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपये जप्त केले होते. तेलंगणा राज्यातील कंत्राटदार जिल्ह्यात तेंदूपत्ता खरेदीचे काम करत असतात.
हेही वाचा -गडचिरोलीच्या कोरोनाबाधित रुग्णाचा हैदराबादमध्ये मृत्यू