गडचिरोली -जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 12 प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. तरीदेखील एका कारचालकाने गडचिरोली-नागपूर मार्गावरील पाल नदीच्या पुरात वाहन टाकल्याने कार वाहून जाताना पुलालगतच्या झाडाला अडकली. यात कारचालकासोबत पाळीव कुत्रा अडकला होता. गडचिरोली बचाव पथकाला त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले.
गडचिरोली-नागपूर मार्गावरील पाल नदीच्या पुरात कार अडकली; जीवितहानी नाही - बचाव पथक
गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 12 प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. तरीदेखील एका कारचालकाने गडचिरोली नागपूर मार्गावरील पाल नदीच्या पुरात वाहन टाकल्याने कार वाहून जाताना पुलालगतच्या झाडाला अडकली. यात कारचालकासोबत पाळीव कुत्रा अडकला होता. गडचिरोली बचाव पथकाला त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले.

गडचिरोली-नागपूर मार्गावरील पाल नदीच्या पुरात कार अडकली; जीवितहानी नाही (संग्रहीत)
तसेच येथे उपस्थित नागरिकांकडून कारमध्ये अडकलेल्या व्यक्तींना काढण्यासाठी दोरखंड टाकून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. ही घटना गडचिरोली शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर घडली आहे. तर घटनास्थळी अंधार आणि पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात अडचणी येत होत्या.
दरम्यान, नदीच्या पुरात कार अर्धी बुडाली असून केवळ कारचा वरचा भाग दिसत होता.