गडचिरोली- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. त्यातच नक्षलवाद्यांनी जाळपोळीचे सत्र सुरू केले आहे. अहेरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे कोरोना संचारबंदीत नक्षलवाद्यांची दहशत ग्रामीण नागरिकांमध्ये पसरली आहे.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हल्ला, 7 वाहनांसह बांधकाम साहित्याची जाळपोळ - गडचिरोली बातमी
अहेरी तालुक्यातील कमलापूर- लिगंमपल्ली मार्गावरील पुलाच्या कामाकरिता आणलेल्या 2 मिक्सर मशीन, 2 ट्रॅक्टरला नक्षलवाद्यांनी आग लावली. तर दुसरीकडे त्याच भागात जिमलगट्टा -किष्टापूर मार्गावरील पुल बनविण्याच्या कामावर असलेल्या 1 ट्रॅक्टर, 2 मिक्सर मशीन, सेन्टरिंग सामानाची जाळपोळ केली.
![गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हल्ला, 7 वाहनांसह बांधकाम साहित्याची जाळपोळ building-materials-burned-with-7-vehicles-by-naxalite-in-gadchiroli](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6707289-thumbnail-3x2-gad.jpg)
हेही वाचा-न्यूयॉर्क शहरात मागील 24 तासामध्ये तब्बल 731 मृत्यू
अहेरी तालुक्यातील कमलापूर- लिगंमपल्ली मार्गावरील पुलाच्या कामाकरिता असलेल्या 2 मिक्सर मशीन, 2 ट्रॅक्टरला नक्षलवाद्यांनी पेटवून दिले. तर दुसरीकडे त्याच भागात जिमलगट्टा -किष्टापूर मार्गावरील पुल बनविण्याच्या कामावर असलेल्या 1 ट्रॅक्टर, 2 मिक्सर मशीन, सेन्टरिंग सामानाची जाळपोळ केली. या घटनेत एकूण 7 वाहन आणि इतर साहित्याची नक्षलवाद्यानी जाळपोळ केली असून लाखोंचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन असतानाही ग्रामीण भागातील हे काम सुरू होते.