महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पर्लकोटा नदीवरील पुलासाठी 120 दुकाने तोडणार; भरपाई व पुनर्वसनाची व्यापाऱ्यांची मागणी

पर्लकोटा नदीवरील पूल निर्माण कार्यास काही दिवसात सुरूवात होणार आहे. यामध्ये भामरागड येथील 120 दुकानांची संपूर्ण व्यापारी लाईन तोडावी लागणार आहेत. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी नुकसान भरपाई व दुकानांकरिता वेगळी जागा देण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे.

व्यापाऱ्यांनी निवेदन दिले
व्यापाऱ्यांनी निवेदन दिले

By

Published : Oct 4, 2020, 5:10 PM IST

गडचिरोली -भामरागड शहरालगतच्या पर्लकोटा नदीवरील पूल निर्माण कार्यास काही दिवसात सुरुवात होणार आहे. यामध्ये भामरागड येथील 120 दुकानांची संपूर्ण व्यापारी लाईन तोडावी लागणार आहेत. त्यासाठी मोजमाप प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये अनेक व्यापाऱ्यांची स्वतःच्या मालकीची दुकाने आहेत. तर काही भाड्याने रूम घेऊन आपला व्यवसाय करत आहेत. मात्र यापुढे जीवन जगायचे कसे, असा प्रश्न या व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी नुकसान भरपाई व दुकानांकरिता वेगळी जागा देण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषण, चक्का जाम तसेच व्यापारी पेट बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा त्रिवेणी व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

भामरागड येतील पर्लकोटा नदीवरील नवीन पूल बांधकामाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. तसेच आलापल्ली-भामरागड आणि नारायणपूर पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग क्र. 130 डी चे निर्माण कार्य देखील सुरू होणार आहे. त्यामुळे पूल व रोड बांधकामात स्थानिक घरे आणि व्यावसायिकांचे दुकाने उध्वस्त होणार आहेत. परिणामी व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन व्यापाऱ्यांवर उपासमाीरीची वेळ येणार आहे. यासंदर्भात भामरागड व्यापारी संघटनेकडून तहसिलदारां मार्फत पालकमंत्री तसेच अहेरी मतदार संघाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात होणारे नुकसान आणि शासनाकडून नुकसान भरपाई प्राप्त करून देण्याची मागणी केलेली आहे. त्रिवेणी व्यापारी संघटना भामरागडचे अध्यक्ष संतोष बडगे यानी ईटीवी भारत प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, आमच्या मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्या, अन्यथा आमरण उपोषण, चाका जाम आंदोलन व सर्व मार्केट लाईन बेमुदत बंद करावी लागेल, असा इशारा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details