गडचिरोली - येथील एंजल देवकुलेला सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रपती भवनाचे निमंत्रण मिळाले आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला ती विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. यावेळी ती वर्षभरात केलेल्या कामगिरीचा अनुभव खेळाडूंशी शेअर करणार आहे.
गडचिरोलीच्या 'एंजल'ला सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रपती भवनाचे निमंत्रण - गडचिरोली एंजल देवकुले राष्ट्रपती पुरस्कार
आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एंजल देवकुलेने जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रपती भवनाचे निमंत्रण मिळाल्याने गडचिरोली जिल्ह्याचा मान आणखी वाढल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली येथील आंतरराष्ट्रीय दर्जाची चिमुकली सिकाई मार्शल आर्ट खेळाडू एंजल देवकुळे हीला सलग दुसऱ्या वर्षीही राष्ट्रपती भवनाचे निमंत्रण मिळाले आहे. अगदी लहान वयात सिकाई मार्शल आर्ट खेळात नैपुण्य प्राप्त केल्याने मागील वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पंतप्रधान बालवीरता पुरस्कार देण्यात आला होता. यंदाच्या 22 जानेवारीच्या सन्मान सोहळ्यात ती प्रमुख अतिथी राहणार आहे. मागील वर्षभरात केलेल्या कामगिरीचे अनुभव यंदाच्या पुरस्कारप्राप्त खेळाडूंशी शेअर करण्यासाठी तिला पुन्हा एकदा विशेष अतिथी म्हणून निमंत्रण मिळाले आहे.
सलग दुसऱ्या वर्षी एंजलला मिळालेल्या सन्मानामुळे तिचे कुटुंबीय व प्रशिक्षक आनंदले आहेत. आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एंजल देवकुलेने जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रपती भवनाचे निमंत्रण मिळाल्याने गडचिरोली जिल्ह्याचा मान आणखी वाढल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.