महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत मलेरियाने घेतला मुलाचा बळी, नातेवाईकांनी केला डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

तुषार सुधाकर विडपी (वय ७) असे मृत पावलेल्या बालकाचे नाव आहे. तुषार दुसऱया वर्गात शिकत होता. १९ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता त्याला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिथे त्याच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यात त्याला मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले. औषधे देऊन त्याला रवाना करण्यात आले.

प्राथमिकआरोग्य केंद्र, लहेरी

By

Published : Nov 23, 2019, 4:09 AM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील होड्री येथे मलेरियामुळे एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बालकाला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. उपचार घेऊन घरी परत नेल्यानंतर त्याचा ज्वर वाढला. पुन्हा आरोग्य केंद्राकडे आणत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला.

तुषार सुधाकर विडपी (वय ७) असे मृत पावलेल्या बालकाचे नाव आहे. तुषार दुसऱया वर्गात शिकत होता. १९ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता त्याला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिथे त्याच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यात त्याला मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले. औषधे देऊन त्याला रवाना करण्यात आले.

हेही वाचा -किशोरी पेडणेकर; नर्स ते मुंबईच्या महापौरपदापर्यंतचा प्रवास

पण, त्याचा रात्री त्याचा ताप वाढला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला आरोग्य केंद्रात नेण्याचा निर्णय घेतला. पण, वाटेतच त्याला मृत्यूने गाठले. मुलाला मलेरिया होता हे माहित असूनही त्याला रुग्णालयात का ठेवले नाही असा प्रश्न नातेवाईक उपस्थित करत आहेत. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा जीव गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा -धक्कादायक! खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने ११ वर्षीय मुलाची आत्महत्या

ही घटना झाल्यानंतर तालूका वैद्यकीय कार्यालयाचे अधिकारी पी.बी. म्हशाखेत्री, पर्यवेक्षक एस. एन. बीटपल्लीवार, पर्यवेक्षक एस. मानूसमारे, आरोग्य सहायक पि.व्ही. चलाख यांनी कुटूबीयांची भेट घेऊन विचारपूस केली.

ABOUT THE AUTHOR

...view details