महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप हे लुटारू सरकार; प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका - वंचित बहुजन आघाडीचे नेते

शेतकऱ्यांना लुटून उद्योगपतींना श्रीमंत करण्याचा काम भाजप सरकारने केले आहे. तसेच भाजप सरकार हे लुटारू सरकार असल्याची घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येथील सभेत केली. तसेच सरकार विविध योजना राबवत असल्याचा गवगवा करीत असले तरी शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला भाजप सरकारच जबाबदार आहे.

गडचिरोली येथील सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर.

By

Published : Oct 10, 2019, 5:57 PM IST

गडचिरोली - शेतकऱ्यांना लुटून उद्योगपतींना श्रीमंत करण्याचा काम भाजप सरकारने केले आहे. तसेच भाजप सरकार हे लुटारू सरकार असल्याची घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येथील सभेत केली. तसेच सरकार विविध योजना राबवत असल्याचा गवगवा करीत असले तरी शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला भाजप सरकारच जबाबदार आहे.

गडचिरोली येथील सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर.

हेही वाचा -मुख्यमंत्री हे मैदानातून पळ काढलेले पैलवान - विजय वडेट्टीवार

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, न्यायालयाच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्यास सामान्य व्यक्तीला कारागृहाची हवा खावी लागते. तर मुख्यमंत्री त्यात निर्दोष सुटतात. मात्र, वर्षभरात ते तुरुंगात दिसतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. या सर्व प्रकारांमुळे हे घोटाळ्यांचे सरकार आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा -शिवसेनेच्या २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचा राजीनामा; ऐन निवडणुकीत शिवसेनेला धक्का

जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन मतदारसंघात वंबआकडून रमेश कोरचा, गोपाल मगरे, लालसू नागोटी हे 3 उमेदवार विधानसभा निवडणूक लढवत आहेत. निवडणूकीच्या निमित्ताने या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी शहरातील इंदिरा गांधी चौकात सभा पार पडली.

ABOUT THE AUTHOR

...view details