महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भामरागड प्रशासनाने स्वखर्चाने नाथजोगी भटक्या समाजातील 17 लोकांना पाठवले गावी

नाथजोगी समाजातील कुटुुंबाने गावी जायला पैसे नाहीत असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने स्वखर्चाने त्यांना गावी पाठवण्याची सोय केली.

seventeen peoples sent to hometown
थजोगी भटक्या समाजातील 17 लोकांना पाठवले गावी

By

Published : May 9, 2020, 8:27 AM IST

Updated : May 9, 2020, 12:48 PM IST

गडचिरोली- लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून भंडारा जिल्हा लाखंदूर परिसरात नाथजोगी भटकंती समाजातील कुटुंब भामरागडात अडकून पडलेले होते. गावाला जाण्यासाठी त्यांना परवानगी मिळाली मात्र त्यांच्याकडे तिकीटासाठी पैसे नव्हते. प्रशासनाने स्वखर्चाने खाजगी बसची व्यवस्था करुन त्या कुटुंबातील 17 लोकांना त्यांच्या गावी शुक्रवारी पाठवले.

नाथजोगी भटक्या समाजातील 17 लोकांना पाठवले गावी

नाथजोगी समाजाातील लोक दररोज गा्वोगावी फिरुन हात बघुन भविष्य सांगने व भजन कीर्तन गाणे,असे काम करीत उपजीविका करतात. भामरागड मध्येही असेच एक आले होते. लॉकडाऊनमुळे त्यांना राहते ठिकाण सोडणे बंद झाले होते. लॉकडाऊन झाल्या पासुन पोलीस, महसुल, व नगर पंचायत प्रशासनाने शुक्रवारपर्यंत त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. मात्र, त्या कुटुंबाने गावी जाण्यासाठी त्यांच्याकडे तिकटाचे पैसे नाही काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे भामरागड महसुल ,पोलीस स्टेशन व नगर पंचायत प्रशासनाकडून काल सांयकाळी स्वखर्चाने खाजगी बस उपलब्ध करुन त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यात आले.

उत्तरप्रदेश,झारखंड व राजस्थानच्या उरलेल्या लोकांची नोंदणी ऑनलाईन केली आहे. रेल्वेची व्यवस्था झाल्यानंतर त्यांच्या गावी पाठवणार आहे, अशी माहिती तहसीलदार सत्यनारायण सीलमवार यांनी दिली.यावेळी ठाणेदार संदीप भांड,नगर पंचायत मुख्याधीकारी सुरज जादव, हवलदार खोब्रागडे, बेगलाजी दुर्गे ,शिपाई संदीप गव्हारे , महसूल विभागाचे कुळसंगे आदी उपस्थित होते.

Last Updated : May 9, 2020, 12:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details