गडचिरोली- भरकटलेल्या हत्तींचा शोध घेत असताना हत्तीने सोंडेत पकडून वनरक्षकाला गंभीर जखमी केले. कोरची तालुक्यातील बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱया कोचीनारा व सातपुती जंगल परिसरात सोमवारी ही घटना घडली. ज्ञानेश्वर चिल्लमवार असे जखमी वनरक्षकाचे नाव असून त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सीमालगतच्या राज्यातून हत्ती कोरची तालुक्यातील बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱया कोचीनारा व सातपुती जंगल परिसरात भटकत आल्याची माहिती आहे. या भरकटलेल्या हत्तींनी बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱया कोचीनारा व सातपुती जंगल परिसरात दहशत माजविली आहे. त्यामुळे गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.