महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौतुकास्पद! गडचिरोलीतील बेलगावात आरओचं पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, लायब्ररीसह सर्व सुविधा; गावाने पटकावले 'आयएसओ' प्रमाणपत्र - बेलगाव विकास मॉडेल गडचिरोली

गडचिरोलीच्या उत्तरेकडील महत्त्वाचा तालुका असलेल्या कुरखेडा तालुक्यातील बेलगाव सध्या जिल्ह्यात विकास कामाच्या मॉडेलसाठी ओळखले जात आहे. या गावाने कमी कालावधीत उत्तम कामगिरी करत आयएसओ प्रमाणपत्र मिळवले आहे. गावाने ध्यास घेत स्वतः परिवर्तन घडवून आणत ग्रामवासीयांचे जीवन उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. गावात ग्रामपंचायतीच्या करवसुलीसाठी एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.

belgaon development gadchiroli  belgaon gadchiroli news  belgaon iso certificate winner village  बेलगाव गडचिरोली न्यूज  बेलगाव विकास मॉडेल गडचिरोली  बेलगाव आयएसओ प्रमाणित गाव गडचिरोली
कौतुकास्पद! गडचिरोलीतील बेलगावात आरओचं पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, लायब्ररीसह सर्व सुविधा; गावाने पटकावले 'आयएसओ' प्रमाणपत्र

By

Published : Jul 29, 2020, 12:49 PM IST

गडचिरोली - मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील बेलगावने संकट काळातही चमकदार कामगिरी केली आहे. या गावाने आपल्या विकास मॉडेलसाठी आयएसओ प्रमाणपत्र पटकावले असून समाज व प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे जिल्ह्यातील इतर गावांच्या तुलनेत बेलगाव वेगळे ठरले आहे. गावाने उन्नती साधताना आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका या तीन क्षेत्रात सर्वानुमते निर्णय घेत ठोस पावले उचलले आहे.

कौतुकास्पद! गडचिरोलीतील बेलगावात आरओचं पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, लायब्ररीसह सर्व सुविधा; गावाने पटकावले 'आयएसओ' प्रमाणपत्र

गडचिरोलीच्या उत्तरेकडील महत्त्वाचा तालुका असलेल्या कुरखेडा तालुक्यातील बेलगाव सध्या जिल्ह्यात विकास कामाच्या मॉडेलसाठी ओळखले जात आहे. या गावाने कमी कालावधीत उत्तम कामगिरी करत आयएसओ प्रमाणपत्र मिळवले आहे. गावाने ध्यास घेत स्वतः परिवर्तन घडवून आणत ग्रामवासीयांचे जीवन उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. गावात ग्रामपंचायतीच्या करवसुलीसाठी एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. जो कर पूर्णपणे भरेल त्याला ग्रामपंचायतीच्या धान्य गिरणीतून मोफत दळण दिले जाणार आहे. याशिवाय गावातील साथरोग नियंत्रणासाठी 'आरओ वॉटर एटीएम'ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील रोगराई संपुष्टात आली आहे.

गावाने मिळवलेल्या आयएसओ प्रमाणपत्र उपक्रमात गावात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे, तरुणांसाठीची लायब्ररी आणि इतर अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. गावाला मिळालेल्या या प्रमाणपत्रामुळे ग्रामस्थ समाधानी आहेत. यात आरोग्य उपकेंद्राचे उन्नतीकरण, शाळेचे डिजिटलायझेशन यासह गावातील महिला व पुरुष बचत गटांसाठी खाद्य वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण यांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमाचा सकारात्मक परिणाम ग्रामस्थांवर दिसत आहे.

बेलगावने घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांचे स्वप्न सत्यात उतरले असून गावातील बचत गटांसाठी प्रशिक्षणासह खाद्यवस्तूंची निर्मिती आणि त्याची विक्री करत गावाने इतरांसाठी आदर्श घालून दिल्याचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. असं म्हणतात की 'गाव करी ते राव न करी', गावाने मनात आणल्यास विकासाची नवी वाट शोधली जाऊ शकते. मात्र, या प्रयत्नांना उत्तम प्रशासकीय जोड मिळाल्याने जिल्ह्यातील इतर गावापेक्षा बेलगाव विकासात सरस ठरले आहे. यापुढच्या काळातही हे मॉडेल सर्व स्वीकारले जावे, अशीच अपेक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details